Thursday 9 May 2013

ज्ञानपीठ 2012

साहित्यक्षेत्रातील अत्यंत सुप्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रख्यात तेलुगू साहित्यिक डॉ. रावुरी भारद्वाज यांच्या नावाची मोहोर उमटली आहे
तेलुगू साहित्यात विविध साहित्य प्रकार हाताळण्याबरोबरच १७ कादंबऱ्या आणि ३७ हून अधिक लघुकथांचे श्रेय त्यांच्या नावावर आहे
डॉ. भारद्वाज यांना याआधी साहित्य अकादमी पुरस्कार, सोविएत लॅण्ड नेहरू पुरस्कार, तेलुगू अकादमी पुरस्कार, बालसाहित्य परिषद पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून नागार्जुन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान केला आहे.
विशेष म्हणजे पठडीतील शिक्षण न घेतलेल्या भारद्वाज यांची अनेक पुस्तके विद्यापीठांमध्ये अध्ययनासाठी असून त्यांच्या काही पुस्तकांवर संशोधनही झाले आहे

No comments:

Post a Comment